Private Advt

यावल तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक : दोन जागा बिनविरोध

यावल : तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीतील 17 सदस्यांच्या जागेपैकी केवळ सहा ग्रामपंचायतीच्या सहा जागांकरीता शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत केवळ 12 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. सात ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी एक ही अर्ज प्राप्त झालेला नाही तर भालोद व बोरखेडा बुद्रुक येथील दोन जागा बिनविरोध होणे निश्‍चित आहे. उर्वरीत चार जागांकरीता 10 उमेदवारी अर्ज असून माघारीनंतर या चार ठिकाणी लढतीचे चित्र स्पष्ट होईल.

अखेरच्या दिवशी 12 अर्ज दाखल
तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीमधील विविध कारणाने री असलेल्या 17 जागे करीता पोटनिवडणुक होत आहे या करीता दिनांक 13 ते 20 मे दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. यात शुक्रवारी शेवटच्या दिवशी 13 पैकी सहा ग्रामपंचायतीतून प्रतिसाद मिळाला व एकूण 12 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यात बोरखेडा बुद्रुक प्रभाग क्रमांक तीनच्या एस.टी.महिला राखीव जागेकरीता गुलशान रमजान तडवी व भालोद प्रभाग क्रमांक 3 अनुसूचित जातीच्या जागेकरीता सचिन गौतम भालेराव यांचे प्रत्येकी एकच अर्ज असल्याने या जागा बिनविरोध होणार हे निश्चित झाले आहे. सावखेडासीम प्र.क्र.3 एस.टी. महिला एका जागेकरीता मुमताज सुलेमान तडवी, कलीमा अकबर तडवी व फरीदा बुर्‍हाण तडवी असे तीन, डांभुर्णी प्र.क्र.5 एसटी महिला एका जागेकरीता सुनंदा हिरालाल कोळी व सुमित्रा गिरीष विसवे असे दोन, राजोरा प्र.क्र.2 सर्वसाधारण एका जागे करीता चेतन विनायक पाटील व पराग दिवाकर पाटील असे दोन व हिंगोणा प्र.क्र.4 एसटी महिला एका जागेकरीता मीना अरमान तडवी, नशिबा रहेमान तडवी व मदिना हमीद तडवी असे तीन अर्ज प्राप्त झाले आहे. या पोटनिवडणुकीत आता 4 ग्रामपंचायीतच्या चार जागेकरीता 10 उमेदवारी अर्ज आहेत. या अर्जांची दिनांक 23 मे रोजी छाननी होईल तर माघारीकरीता 25 मे पर्यंत मुदत आहे. माघारी नंतर 25 मे रोजी दुपारी 3 वाजेला चिन्ह वाटप हाईले. 5 जुन रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे तर मतमोजणी 6 जुन रोजी येथील तहसील कार्यालयात होईल. निवडणुकीकरीता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिन जगताप, हनीफ तडवी, मिलिंद देवरे, बबिता चौधरी, शेखर तडवी, पी.ए.कडनोर कामकाज पाहत आहे.