Private Advt

यावल तालुक्यातील अल्पवयीन मुलीला पळवले

फैजपूर : यावल तालुक्यातील एका गावातून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा
यावल तालुक्यातील एका गावात 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. 26 जानेवारी रोजी सकाळी मी पेपर देवून येते असे सांगून अल्पवयीन मुलगी ही घरातून बाहेर गेली. त्यानंतर ती सायंकाळपर्यंत घरी परतली नव्हती. त्यामुळे तिचे पालक चिंतेत होते. अल्पवयीन मुलीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कुठेही यांची माहिती मिळाली नाही. अल्पवयीन मुलीच्या वडीलांनी गुरूवार, 27 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता फैजपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून अज्ञात व्यक्तीविरोधात फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास हवालदार राजेश बर्‍हाटे करीत आहे.