यावल, चाळीसगाव तालुक्यात अवकाळी सरींसह गारपीट

0

चाळीसगाव। तालुक्यात यावर्षी अचानक उन्हाच्या तडाख्यात वाढ झाली होती. त्यामुळे लोक गारव्याच्या शोधात असतांना आज सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन पावसाच्या सरी बरसल्या. पिंप्री व खेडगाव येथे शेतातील मजुरांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला मेेहुणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उन्हाळा सुरू असल्याने तापमानात वाढ झालेली आहे. आज दुपारी अचानके वातारवरणात बदल व पावसाच्या सरी काहीठिकाणी तालुक्यात बरसल्या. शहरात देखील असेच काहीसे वातावरण रोडच्या बाजुला छोटा व्यवसाय करणार्‍यांची धांदल उडाली. कारण मे महिन्याची सुरूवात असल्याने अचानक पावसाची अपेक्षा नव्हती.

भरपाईची तहसीलदारांची शिफारस
तालुक्यातील खेडगाव शिवारातील शेतात काम करत असतांना पितांबर हिरामन सुर्यवंशी (21, रा. – खेडगाव ता. चाळीसगाव) यांचेवर 7 मेरोजी सायंकाळी वीज पडल्याने या मजुराचा जागीच मृत्यू झाला . पिलखोड येथील रहीवाशी किरण सतिलाल माळी (भिल्ल,वय 22 )हा मजुरांसह पिंप्री शिवारातील विनोद नाना पाटील यांच्या शेताच्या बाजुला मजुरीसाठी आला होता. काम आटोपून घराकडे निघत असतांना सायंकाळी त्याचेवर विज पडल्याने त्याचादेखील जागीच मृत्यू झाला आहे. दोन्ही ठिकाणचे पंचनामे मेहुणबारे पोलीसांनी

यावललाही महिला जखमी
यावल शहरातील महाराणा प्रतापनगर भागातील रहिवाशी काजल भूषण कोळी यां महिलेच्याच्या अंगावर वीज कोसळली त्यांच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ. स्वप्नील पाटील उपचार करत आहेत. यावल तालुक्यात किनगांव , नायगावसह परिसरात वादळासह पाऊस रात्री आठ वाजेपर्यंत सुरुच होता. चिंचोली परीसरात गारांचा व वादळी पाऊस अचानक सुरु झाल्याने उन्हाळी फळे विकणार्‍या व्यापार्‍यांना फटका बसला.