यावल घरफोडी प्रकरण ; चौथ्या आरोपीला अटक ; मुद्देमालही हस्तगत

0

यावल- यावल पोलिस स्टेशन अंतर्गत कुंभार टेकडी परीसरात 14 नोव्हेंबर रोजी झालेल्या घरफोडीत 21 हजाराचा ऐवज चोरी प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. आरोपींच्या चौकशीत त्यांचा आणखी एक साथीदार असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यासही अटक करण्यात आली. त्यास अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. कुंभारटेकडी भागातील भगवान वसंत कुंभार यांच्याकडे 14 नोव्हेंबर रोजी झालेल्या घरफोडी प्रकरणी
अल्ताफ खान रशीद खान (रा.रजा नगर, सुरत, गुजरात), मोमीन नदीम शेख ताहेर (डांगपुरा, यावल), तौसीफ खान मेहमूद खान (आयशा नगर, नवी वसाहत यावल) या तिघांना अटक करण्यात आली तर न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. चौकशीदरम्यान आरोपींचा साथीदार शेख शोएब शेख हरून (बाहेरपुरा, यावल) असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यासही अटक करण्यात आली. आरोपींच्या पोलिस कोठडीत झालेल्या चौकशीदरम्यान चोरीचा काही माल हस्तगत करण्यात आला तर उर्वरत माल अजून हस्तगत होणार आहे. आरोपींची शुक्रवार, 30 रोजी पोलिस कोठडी संपत असून पुन्हा त्यांना न्यायालयासमोर उभे करण्यात येणार आहे.

Copy