यावल घरफोडी प्रकरणी चौथ्या संशयीताला अटक

0

यावल- शहरातील कुंभार टेकडीजवळ झालेल्या घरफोडीप्रकरणी पोलिसांनी शेख शोहेब शेख हारून (रा. बाहेरपुरा, यावल) यास अटक केली असून आता अटकेतील आरोपींच्या संख्या चार झाली आहे. 27 नोव्हेंबरला तीन संशयीतांना अटक केली होती तर त्याच दिवशी शोहेबचे नाव संशयीत म्हणून समोर आले होते तर 27 नोव्हेंबरला त्याचा विवाह होणार होता मात्र वधू कडील मंडळींना शोहेबचा चोरीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याने विवाह मोडण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

अटकेतील आरोपींची संख्या झाली चार
14 नोव्हेंबर रोजी कुंभार टेकडी भागातील भगवान वसंत कुंभार यांच्या घरातून चोरट्यांनी 11 हजार 145 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिन्यांसह 10 हजार रुपयांची रोकड लांबवली होती. या प्रकरणी अलताफ खान रशीद खान (25, रा.बाबुजीपुरा, यावल), मोमीन नदीम शेख ताहेर (19, रा.डांगपूरा, यावल) व तौसीफ खान महेमुद खान (22) यांनी केल्याचे समोर आले. या गुन्ह्यात शेख शोहेब शेख हारून हा देखील असल्याचे कळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील, हवालदार गोरख पाटील करीत आहे.

Copy