यावल आदिवासी मुलींच्या वसतिगृहात आयसोलेशन वॉर्ड : प्रांतांसह अधिकार्‍यांकडून पाहणी

0

यावल : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे संशयीत रुग्ण आढळल्यास त्याला आयसोलेशन विभागात ठेवण्याची व्यवस्था येथील यावल फैजपूर मार्गावरील आदिवासी मुलींचे वसतिगृहात करण्यात आली आहे. गुरुवारी फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्यासह तहसीलदार जितेंद्र कुंवर, यावल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमंत बर्‍हाटे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांच्यासह जिल्हा परीषद सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, पंचायत समितीचे सदस्य शेखर सोपान पाटील, आदिवासी कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी डी.व्ही.चौधरी मुलींच्या वसतिगृहाच्या गृहपाल कुंदा भंगाळे याप्रसंगी उपस्थित होत्या.

प्रांताधिकार्‍यांनी केली पाहणी
प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी आदिवासी मुलींच्या वसतीगृहातील आयसोशन वॉर्डाची पाहणी केली तसेच यावल येथील मुलांचे वसतिगृह तसेच फैजपूर मार्गावरील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे आयसोलेशन विभागाची पाहणी केली व याठिकाणी उपस्थित तहसीलदार, आरोग्य अधिकारी व आदिवासी विभागाच्या अधिकार्‍यांना व प्रशासन यंत्रणेला सज्ज राहण्याबाबत कोरोनाच्या या संसर्गजन्य आजाराच्या संशयित रुग्णांसाठी खबरदारी घेण्याच्या व दक्ष राहण्याच्या काही महत्त्वाच्या सूचना दिल्या.

Copy