यावल अभयारण्यात वनमजुरांना किराणा वाटप

0

खिर्डी : यावल अभयारण्यातील वन संरक्षण कुटी व वन तपासणी नाके येथे वनसंरक्षणाची कामे करणार्‍या हंगामी मजुरांना मदत म्हणून गहू, तांदुळ, तेल, साखर, चहा पावडर, मसाले यासारख्या जीवनावश्यक वस्तुंचे वाटप नुकतेच शुभम अनिल अंजनकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

वनमजुरांनी व्यक्त केले समाधान
शुभम अंजनकर हे वनसंरक्षक वन्यजीव नाशिक अनिल अंजनकर यांचे सुपुत्र आहेत. गरजू व्यक्तिंना मदत केल्याने वनमजुरांनी समाधान व्यक्त केले असल्याची माहिती पाल वन परीक्षेत्र अधिकारी राजेश पवार यांनी दिली. यावल व पाल अभयारण्यातील कर्मचारी व वनमजुरांना कोरोनाबद्दल जनजागृती करुण सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. वन परीक्षेत्र अधिकारी अक्षय म्हेत्रे, यावल अभयारण्यातील व पालमधील वनक्षेत्रातील पंचकुटी, तपोवन, सिन्नर बारा कुटी, सातपुडा कुटी तसेच खिरोदा हेकळझिरी व मांजल नाका येथे काम करणार्‍या व जामन्या वनक्षेत्रातील वसुंधरा आमराई, नीलकंठ, माथन, मरुरकुटी, वाकी, देव नाला, शेन पाणी नाला, कांजपानी, मुंजोबा, गाडर्‍या, उसमळी, हवालदान्या आदी ठिकाणी काम करणारे कर्मचारी व वनमजूर यांना सॅनिनटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.

पाल व जामन्या भागात करोना जनजागृती
कोरोनाबद्दल जामन्या व पाल वनपरीक्षेत्रामधे वनमजूर व वन संरक्षक नियमांचे पालन करीत असून वनपरीक्षेत्र अधिकारी अक्षय म्हेत्रे व राजेश पवार यांनी जनजागृती केली.

Copy