यावलला 23 वर्षीय तरुणीचा विनयभंग : दाम्पत्याविरोधात गुन्हा

यावल : भावासोबत होत असलेल्या भांडणात बोलण्यास गेलेल्या 23 वर्षीय तरुणीस मारहाण करीत तिचा विनयभंग करण्यात आला. ही घटना शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेजवळ शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल
यावल शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेजवळील रहिवाशांमध्ये भांडण होत असताना 23 वर्षीय तरुणी आपल्या भावासोबत का भांडण करीत आहे ? असे बोलण्यास गेली असता तिला संशयीत विनोद बळीराम जाधव व त्यांची पत्नी दीपाली जाधव यांनी मारहाण केली. तरुणीच्या अंगातील टी-शर्ट फाडण्याचा प्रयत्न करीत विनयभंग करून अश्लील शिविगाळ करण्यात आली. 23 वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिस ठाण्यात विनोद जाधव व त्यांची पत्नी दीपाली जाधव या दोघांविरूध्द विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे.