Private Advt

यावलला पेरू तोडण्यास गेलेल्या बालकास मारहाण : पिता-पुत्राविरूध्द गुन्ह

यावल : शहरातील फालक नगरात पेरू तोडण्यास आलेल्या बालका पिता-पुत्रांनी मारहाण केल्याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना शनीवारी सायंकाळी घडली. शेख सादिक (रा.बाबूजीपुरा, यावल) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी सांयकाळी त्यांचा मुलगा शेख दानिश (7) हा व सोबत शेख वकार शेख युनूस शेख अनिस असे तिघे फालक नगरात त्यांचे भाऊ शेख बाबू यांच्याकडे गेले असता रस्त्यात एका बंगल्यात पेरूचे झाड दिसल्यानंतर ते तोडणे करीता एकाने झाडावर दगड मारला तेव्हा याचा राग येत शिरीष लिलाधर चौधरी व त्यांचा मुलगा तन्मय शिरीष चौधरी या दोघांनी त्यास चापटा बुक्क्यानी तसे कमरेच्या पट्ट्यांनी मारहाण केल्याने दोघां विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा.फौजदार नेताजी वंजारी, नितीन चव्हाण करीत आहे.