यावलला पत्नीस मारहाण : मद्यपी पतीविरोधात गुन्हा

यावल : दारूच्या नशेत मुलांना मारहाण करणार्‍या पतीला जाब विचारल्याचा राग आल्याने मद्यपी पतीने पत्नीही मारहाण केली. शहरातील विठ्ठलवाडी भागात 2 रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पतीविरोधात गुन्हा
संशयीत आरोपी नामदेव जगन्नाथ कोळी हा पत्नी व मुलांसह विठ्ठलवाडी भागात वास्तव्याला आहे. मंगळवार, 2 रोजी पहाटे संशयीत मद्याच्या नशेत मुलांना मारहाण करीत असताना पत्नीने त्याबाबत जाब विचारल्याने त्यास राग आल्याने त्याने पत्नीस मारहाण करीत डोळ्याखाली चावा घेतला. या संदर्भात विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने पती नामदेव जगन्नाथ कोळी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक बालक बार्‍हे करीत आहे.