यावलमध्ये 13 ते 15 दरम्यान जनता कर्फ्यू

0

यावल : कोरोनाचा वाढत चाललेला फैलाव पाहता यावल नगरपरीषदेचे नगराध्यक्ष राकेश कोलते यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरीषदेच्या सभागृहामध्ये व्यापारी मंडळ तसेच सर्व पक्षीय कार्यकर्ते व सर्व नगरसेवक यांची स्वतंत्र बैठक झाली. कोरोना चे संक्रमण थोपविण्यासाठी उत्स्फूर्तपणे जनता कर्फ्यूचे पाळण्याचे ठरले व कोरोना संक्रमणाची साखळी खंडित होण्यासाठी 13 ते 15 जून दरम्यान तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याबाबत एकमत झाले

अत्यावश्यक सेवा राहणार सुरू
या काळात दवाखाना, औषध विक्रीची दुकाने, दूध विक्री केंद्र व कृषी केंद्र अशा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय झाला. शहरातील नागरीकांनी अनावश्यकरीत्या घराबाहेर पडू नये व बंद कडकडीत पाळण्यात यावा असे आवाहन शहराचे नगराध्यक्ष राकेश कोलते, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष सलिल महाजन, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, राष्ट्रवादीचे प्रा.मुकेश येवले, हाजी शब्बीर खान, ताहेर शेठ, अशपाक सर, अय्यूब सर, सचिन मिस्तरी, निलेश गडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, भाजपाचे उमेश फेगडे, शिवसेनेचे जगदीश कवडीवाले, मनसेचे चेतन अढळकर, गोलू माळी, इकबाल खान यांच्यासह सर्व नगरसेवकांनी केले आहे.

Copy