यावलमध्ये हिंदू-मुस्लीम एकता मंचतर्फे गोर-गरीबांना जेवण

0

यावल : शहरात हिंदू-मुस्लीम एकता मंच तर्फे गोर गरीबांना दर रोज संध्याकाळी जेवण वाटप करण्यात येत आहे. तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी पोलिस ठाण्यात उपस्थिती देत या उपक्रमाचे कौतुक केले. यावल शहरातील श्री राम नगर, पंचशील नगर, मांगवाडा, आझाद नगर, बाबा नगर, सईद पुरा, कुंभार खंड, ईस्लामपुरा, बाबुजी पुरा, प्रताप नगर, खिर्णिपुरा, सुंदर नगरी, शिवाजी नगर, भिलवाडी आदी भागात हिंदु मुस्लीम एकता मंच तर्फे जेवण वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी कदीर खान, राजेश करांडे, शेख अस्लम, नेहाल अहमद, दिवाकर फेगडे, अजहर शेख, अस्लम सर, चेतन पाटील, कलीमोधीन शेख, ईकबाल खान, चेतन करांडे, जुबेर सर, नासीर पटेल, शोएब अहमद, उस्मान खान, प्रांजल सोनवणे, उमर खान, हर्षल करंडे आदी परीश्रम घेत आहेत.

Copy