यावलमध्ये श्री संत गजानन महाराज प्रकट दिन कार्यक्रम रद्द

यावल : श्री संत गजानन महाराज प्रकट दिनाचा कार्यक्रम यावल येथील गजानन महाराज मंदिर संस्थानच्यावतीने रद्द करण्यात आला आहे. यावलमधील विरार नगरातील श्री संत गजानन महाराज मंदिरात दरवर्षी गजानन महाराज प्रकट दिन अति उत्साहात आणि थाटामाटात पार पडतो. प्रकट दिनाच्या दिवशी सकाळी पालखी, दुपारची आरती आणि त्यानंतर दिवसभर येणार्‍या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यावर्षीचा विरार नगर मंदिरातील गजानन महाराज प्रगट दिनाचा कार्यक्रम आणि उत्सव रद्द करण्यात आल्याचे गजानन महाराज मंदिर विश्वस्तांनी सांगितले. भाविकांनी याची नोंद घेऊन प्रकट दिनाच्या दिवशी पूजा अर्चना आपापल्या घरी करावी, असे आवाहन विरार नगर गजानन महाराज मंदिर संस्थान विश्वस्तांनी केले आहे.

Copy