यावलमध्ये वारीस फाऊंडेशनतर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

0

यावल : कोरोना विषाणुला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे उद्योग व्यवसाय बंद आहेत त्यामुळे कामगार मजुर वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्‍वभूमीवर यावलमधील वारीस फाऊंडेशनच्या वतीने 600 गरजूंना धान्य व खाद्य साहित्याचे वाटप करण्यात आले. उद्घाटन तहसीलदार कुंवर यांच्याहस्ते झाले.

यांची होती उपस्थिती
संगी अध्यक्ष मोहम्मद हकीम मोहम्मद याकूब, उपाध्यक्ष हाजी आताऊल्ला खान सैफुल्ला खान, सचिव हाजी शेख हकीम अलाउद्दीन, खजिनदार अयुबखान फजलूल रहेमान खान, सदस्य आसीफ खान हुसेन खान, डॉ. शकील सईद सै.बशारत अली , किफायत अली, शेख अलीम मोहम्मद रफीक, शेख करीम अब्दुल रज्जाक मन्यार सय्यद रशीद, सय्यद निसार पैलवान शेरखान जुबेर खान, अयुब खान हमीद खान आदींची उपस्थिती होती. दरम्यान, गरजूंना साहित्य देताना कुणीही फोटो व व्हिडिओ न काढण्याची सूचना करण्यात आली व तिचे शंभर टक्के पालन करण्यात आले त्यामुळे गरजूंनीही समाधान व्यक्त केले.

Copy