यावलमध्ये धूम स्टाईल मोबाईल लांबवला

यावल : संचारबंदी असल्याने रस्त्यावर कुणीच नसल्याचा फायदा घेत मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात भामट्यांनी पादचार्‍याचा मोबाईल लांबवला. विजय सुधाकर कोष्टी (30, फालक नगर, यावल) हे मंगळवारी आठ वाजेच्या सुमारास आपल्या घरी जात असतांना मोबाईल आल्याने बोलत असताना भुसावळ टी पॉईंट वरून जात असतांना धूम स्टाईल आलेल्या भामट्यांनी 13 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला.