Private Advt

यावलमध्ये गावठी कट्टा बाळगणार्‍या तरुणाला अटक

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

यावल : शहरातील सुंदर नगर भागातील एका तरुणाकडे गावठी कट्टा असल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी मंगळवारी दुपारी कारवाई करीत 20 हजार रुपये किंमतीचा कट्टा जप्त केला व तरुणास अटक केली. यश राजेंद्र पाटील (20, रा.सुंदर नगरी, यावल) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना यावल शहरातील तरुणाकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने यश राजेंद्र पाटील यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याच्या कमरेला गावठी कट्टा आढळल्याने तो जप्त करण्यात आला. यावल पोलिसात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अशोक महाजन, एएसआय शरीफ काझी, नाईक युनूस शेख, नाईक किशोर राठोड, कॉन्स्टेबल विनोद पाटील, कॉन्स्टेबल रणजीत जाधव आदींच्या पथकाने केली.