Private Advt

यावलमध्ये गावठी कट्टा बाळगला : तरुणाला तीन दिवसांची पोलिस कोठडी

यावल : गावठी पिस्तूल प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 21 वर्षीय तरुणास सोमवारी न्यायायात हजर केले असता त्यास 5 जानेवारी पर्यंत तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

गोपनीय माहितीवरून झाली कारवाई
शहरातील श्रीराम नगरातील रहिवासी सुमित युवराज घारू (21) हा तरुण यावल पोलिस ठाण्यातील सफाई कर्मचारी युवराज घारू यांचा मुलगा असून त्याच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली होती. आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेली दुचाकी चोरीची निघाल्याने तीदेखील जप्त करण्यात आली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सोमवारी सुमित घारू यास येथील न्यायालयात प्रथमवर्ग न्या.एम.एस. बनचरे यांच्या न्यायासनासमोर हजर केले असता त्यास तीन दिवसाची अर्थात 5 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अधिक पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नितिन चव्हाण करीत आहे.

दुसर्‍या गुन्ह्यात करणार अटक
समीर जहाँगीर तडवी (हरीरओम नगर, हल्ली मु.खानापुर, ता.रावेर) यांनी सोमवारी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची दुचाकी (क्रमांक एम.एच.19 डी.पी.1075) ही साकळी जवळील साई धाबा येथुन चोरी गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यात पुन्हा सुमित घारू यास अटक करण्यात येणार आहे.