यावलमध्ये कोरोना योद्ध्यांना अर्सेनिक अल्बम 30 औषधांचे वाटप

0

यावल : तालुक्यातील राणे कुटुंबाच्या माध्यमातून यावलच्या ग्रामीण रुग्णालयातील कर्मचार्‍यांना कोरोना या महामारीच्या आजारापासुन नागरीकांचे संरक्षण व्हावे या दृष्टीकोणातुन असैनिक अल्बम 30या औषधींचे वाटप करण्यात आले. विश्वनाथ दिगंबर राणे, खुशाल दिनकर राणे (हिंगोणा) यांच्या हस्ते कोरोनाविरूद्ध रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे अर्सेनिक अल्बम 30 ही औषधी वाटप करण्यात आली. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रल्हाद पवार, सुर्यकांत पाटील, विजय वाढे, नानासाहेब घोडके व किरण जावळे यांच्यासह आदी उपस्थित होते.

Copy