यावलमध्ये कोरोनावर मात करणार्‍या डॉक्टरांचे नागरीकांकडून स्वागत

0

यावल : कोरोनावर मात करून घरी परतलेल्या दोन डॉक्टरांचे यावलकरांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. शहरातील सुदर्शन चित्र मंदिर परीसरात राहणारे डॉक्टर गेल्या 25 दिवसांपासून डॉक्टर-पितापुत्र कोवीड केअर सेंटरमध्ये उपचार घेत होते. काही दिवसांपुर्वी मुलगा बरा होवून त्याला घरी सोडण्यात आले होते. शनिवारी डॉक्टर असलेल्या पित्यासह आणखी एका डॉक्टर यांची दुसरी कोरोना टेस्ट निगेटीव्ह आल्याने दोघांना कोरोनामुक्त झाल्याचे घोषीत करून त्यांनी घरी सोडण्यात आले. वास्तव्यास असलेल्या परीसरातील नागरीकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून टाळ्या वाजवून स्वागत केले. कोरोना संसर्गाशी उपचार करून त्यावर मात करणार्‍यांची देखील हळुवार का होईना संख्या वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

Copy