Private Advt

यावलमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग : एकाविरोधात गुन्हा

यावल : शहरातील एका भागात राहणार्‍या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात संशयीत संदीप धनराज सोनवणे (यावल) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परीवारासह राहते व स्थानिक विद्यालयातच शिक्षण घेते. संशयीत आरोपी संदीप धनराज सोनवणे (यावल) हा गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अल्पवयीन मुलाचा पाठलाग करून घराजवळ चकरा मारत होता तर शनिवार, 2 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरात एकटी असतांना संशयित आरोपी संदीप सोनवणे घरात घुरून मुलीशी अंगलट केले. याप्रकरणी अल्पवयीन पीडीत मुलीच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री आठ वाजता संशयीत आरोपी संदीप सोनवणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहे.