Private Advt

यावलमधून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

यावल : शहरातील एका भागातील रहिवासी असलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी यावल पोलिसात मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील एका भागात 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवार, 25 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने मुलीला फुस लावून पळविले. मुलीच्या नातेवाईकांनी गावात, परीसरातील आणि नातेवाईकांकडे शोधाशोध केली परंतु अल्पवयीन मुलगी कुठेच आढळून आली नाही. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून यावल पोलिस ठाण्यात सायंकाळी सात वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अजमत पठाण करीत आहेत.