यावलमधील 45 वर्षीय इसमाला कोरोनाची लागण

0

यावल : शहरातील बाबूजीपुरा परीसरातील एका संशयीत रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे. या वृत्ताला तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी दुजोरा दिला आहे. प्रशासनातर्फे रुग्णाच्या वास्तव्य परीसरात उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून बाबुजीपुरा परीसरात राहणार्‍या सुमारे 45 वर्षीय व्यक्तीला तीन दिवसांपुर्वी कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी जळगावातील जिल्हा कोवीड रूग्णालयात दाखल केले होते. त्याच दिवशी स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आल्यानंतर रविवारी कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी दिली. खबरदारी म्हणून आरोग्य यंत्रणेने बाबुजीपुरा परीसराला प्रतिबंधित करण्यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी बबन तडवी, नगरपालिकेचे कर्मचारी व आरोग्य कर्मचारी दाखल झाले आहेत.

Copy