यावलमधील 23 वर्षीय तरुणाचा डेंग्यूने मृत्यू

यावल : शहरातील विस्तारीत वसाहतीतील गणपती नगरातील 23 वर्षीय आदिवासी तरुणाचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाला. शनिवार, 11 रोजी ही घटना घडली. सादीक गनी तडवी (23) असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पालिकेच्या कारभारामुळे डेंग्यू रुग्ण वाढले
शहरातील विस्तारीत क्षेत्रातील वसाहतीतील गणपती नगरातील उच्चशिक्षीत आदिवासी तरुण सादीक गनी तडवी (23) यास गुरुवार, 9 सप्टेंबर रोजी हिवतापासह उलट्यांचा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना उपचारार्थ हलवण्यात आले असता डेंग्यूचे निदान झाले. त्यानंतर तरुणावर उपचार सुरू असतानाच शनिवार, 11 सप्टेंबर रोजी भुसावळातील एका खाजगी रुग्णालयात तरुणाचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार (दफनविधी) करण्यात आला. यावल तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रात मागील काही दिवसांपासून ग्रामपंचायत व आरोग्य यंत्रणेच्या दुर्लक्षीत कारभारामुळे मोठ्या प्रमाणावर डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. यावल नगरपरीषद क्षेत्रात गेल्या अनेक महिन्यांपासून जंतनाशक औषधांची फवारणी करण्यात आली नसल्याने तसेच स्वच्छता मोहिम देखील मंदावल्याने डेंग्यूच्या रुग्णात वाढ झाल्याचा आरोप नागरीकातून होत आहे.

Copy