Private Advt

यावलमधील विवाहिता दिड वर्षीय बाळासह बेपत्ता

यावल : शहरातील तडवी कॉलनी भागातील 22 वर्षीय विवाहिता दिड वर्षीय बाळासह बेपत्ता झाली असून या प्रकरणी यावल पोलिसात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली. अवघ्या दोन वर्षांपूर्वीच या विवाहितेचे लव्ह मॅरेज होवून ती यावलमध्ये पतीसह वास्तव्यास आली होती. शहरात फैजपूर रस्त्या लगत असलेल्या तडवी कॉलनी साहिल नगर भागातील रहिवासी जावेद यासीन तडवी याने यावल पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार तो 2020 मध्ये आई-वडीलांसह नाशिकला वास्तव्यास होता नाशिकमधील कापड दुक1ानात कामास होता. त्याच ठिकाणी पलक तडवी ही तरूणी देखील कामाला होती तेव्हा या दोघांमध्ये प्रेम झाले आणी त्यांनी 2020 मध्ये लव्ह मॅरेज केले. नंतर ते यावल शहरात तडवी कॉलनीत राहु लागले येथे या दोघांना मुलगा झाला आहे. मुलगा आरूष तडवी हा दिड वर्षाचा झाला आहे. सर्व काही व्यवस्थित सुरू असतांना 0 मे रोजी दुपारपासून पलक जावेद तडवी (22) व मुलगा आरूष तडवी (1.5) दोघे घरातुन बेपत्ता झाले. शोध घेवूनही माय-लेक न आढळल्याने यावल पोलिसात दोघांची हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली. पुढील तपास यावल पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरिक्षक आयपीएस अधिकारी आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बालक बार्‍हे करीत आहे.