यावलमधील तरुणांचा अपघाती मृत्यू

0

अज्ञात वाहन चालक अपघातानंतर पसार

यावल : यावल शहरातील बोरावल गेट परीसरात राहणारे दोन तरुण हे सोमवारी रात्री 9 .40 वाजेच्या सुमारास भुसावळहून यावलकडे दुचाकी (एम.एच 19 डी.एल.3067) ने येत असताना शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या घोडेपीर बाबा दर्ग्याजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या तरुणांचा मृत्यू झाला. पुंडलिक चंद्रकांत सोनवणे (19) व रोशन कैलास सोनवणे (18) अशी मयतांची नावे आहेत.

Copy