Private Advt

यावलमधील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

यावल : शहरातील एका भागातील 17 वर्षीय अल्पवयीन फुस लावून पळवून नेल्याची घटना 15 ऑगस्ट रोजी घडली. पाच दिवसानंतर पीडीत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात शुक्रवारी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यावल शहरातील एका भागातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या नातेवाईकांसह राहते. 15 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता अज्ञात व्यक्तीने फूस लावत तिला पळवून नेले. अल्पवयीन मुलीच्या वडीलांसह सर्व नातेवाईकांनी तिच्या मैत्रिणीकडे व नातेवाईकडे शोध घेतला मात्र ती कुठेही न आढळल्याने पीडीत मुलीच्या वडीलांना शुक्रवार, 20 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीने मुलीला पळवून नेल्याची तक्रार दिली. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण करीत आहे.