Private Advt

यावलमधील अल्पवयीन मुलीचे अपहरण : आरोपीला अटक

यावल : शहरातून एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे आठ महिन्यापुर्वी अज्ञात व्यक्तीने अपहरण केले होते. मुलीचा यावल पोलिसांनी शोध लावत एका तरुणाला अटक केली. संशयीताला न्यायालयात हजर केल्यानंतर चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. वैभव अर्जुन बाविस्कर (21, रा.शिवाजी नगर, यावल) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

मुलीची बालसुधारगृहात रवानगी
यावल शहरातून 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी जून महिन्यामध्ये बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी यावल पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. यावल पोलीस या अल्पवयीन मुलीचा शोध घेत असताना ती शिरसोली, ता.जळगाव येथे असल्याची माहिती पोलिसांना माहिती मिळाली व पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर यांनी या मुलीस ताब्यात घेतले. ही मुलगी वैभव अर्जुन बाविस्कर (21, रा.शिवाजी नगर, यावल) याच्यासोबत असल्यान त्यासही अटक करण्यात आली. या मुलीस वैभव हा 7 जुन 2021 रोजी दुचाकीद्वारे खंडवा येथे घेवून गेला होता व त्यानंतर शिरसोली या गावात राहायला आले होते. या प्रकरणी तरुणाविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण, अपहरणासह लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, बालिकेची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहे.