Private Advt

यावलच्या विवाहितेचा एक लाखांसाठी छळ : पतीसह पाच आरोपींविरोधात गुन्हा

यावल : तालुक्यातील साकळी येथील माहेर व यावल येथील सासर असलेल्या विवाहितेने माहेरून एक लाख रुपये आणावेत म्हणून सासरच्या मंडळींनी छळ केला. या प्रकरणी विवाहितेने पतीसह चार जणांविरोधात यावल पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.

एक लाख रुपये न आणल्याने छळ
यावल तालुक्यातील साकळी येथील माहेर असलेल्या शमिमबी शेख अनवर (22) यांचा विवाहित यावल शहरातील आयशा नगरातील शेख अनवर शेख मुसा यांच्याशी 2019 मध्ये रीतीरीवाजानुसार झाला. लग्नाचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती शेख अनवर शेख मुसा याने विवाहितेला माहेरहून एक लाख रूपये आणण्याची मागणी केली. विवाहितेच्या आई-वडीलांची परीस्थिती हालाखीची असल्याने पैश्यांची पुर्तता करू शकत नाही, असे सांगितल्यावर विवाहितेला शिविगाळ व मारहाण करण्यात आली. सासू व सासरे, जेठ आणि जेठाणी यांनी विवाहितेला शिवीगाळ व दमदाटी करीत लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत विवाहितेला घरातून हाकलून दिले.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
विवाहितने सोमवार, 3 जानेवारी रोजी रात्री 10 वाजता यावल पोलिसात तक्रार दिल्याने यावल पोलिस ठाण्यात पती शेख अन्वर शेख मुसा, सासरे शेख मुसा शेख कादर, सासू नमजाबी शेख मुसा, जेठ शेख मोमीन शेख मुसा आणि जेठाणी नसीमबी शेख मोमीन (सर्व रा.आयशा नगर, यावल) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे.