यावलच्या पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ : पाच जणांविरोधात गुन्हा

यावल : नोकरीसाठी माहेरहून पाच लाख रूपये न आणल्याने यावलमधील माहेर असलेल्या विवाहितेचा पतीसह पाच जणांनी छळ केल्याने त्यांच्याविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. माधुरी भुषण फुसे (28, मेन रोड, यावल) या विवाहितेच्या फिर्यादीनुसार त्यांचा विवाह नेहरू नगर, रामानंद नगरजवळ, जळगाव येथील भुषण यशवंत फुसे यांच्याशी 30 मार्च 2019 रोजी झाला होता. लग्नाच्या आठ दिवसातच पती भूषण फुसे यांनी किरकोळ कारणावरून त्यांना शिवीगाळ करणे सुरू केले व आपणास नोकरीकरीता आवश्यक पाच लाख रुपये माहेरहून आणावेत यासाठी मारहाण करण्यास सुरूवात केली. लग्नाला वर्ष झाल्यानंतर मूलबाळ होत नाही म्हणून पतीसह सासु, सासरे, नणंद, नंदोई आदींनी तिचा छळ केला. या छळास कंटाळून विवाहिता माहेरी यावल येथे निघून आली व शुक्रवारी यावल पोलिसात आरोपी पती भूषण फुसे, सासरे यशवंत फुसे, सासु सुमित्रा फुसे, नणंद पूनम असवाल आणि नंदोई हितेंद्र आसवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.पोलिस निरीक्षक अजमल खान पठाण करीत आहेत.