यापुढे पुण्यात लॉकडाऊन नाही: जिल्हाधिकारी

0

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने पुणे व पिंपरीत शहरात १३ जुलै ते 23 जुलै असा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सुरुवातीला ५ दिवस लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर या नियमांत काही प्रमाणात शिथिलता आणण्यात आली आहे. पण आता या पुढे पुण्यात कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन असणार नाही असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले आहे. सोमवारी लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता आणल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यावेळी ते बोलत होते.

Copy