यात्रेसाठी जात असलेल्या तरूणांच्या दुचाकीचा अपघात

0

जळगाव : जामनेर तालुक्यातील सिंगोडा या गावी यात्रेसाठी जात असलेल्या मेहरूण येथील तरूणांच्या दुचाकीला चिंचोली गावाजवळ भरधाव वेगात जाणार्‍या कारने समोरून धडक दिली. ही घटना आज सोमवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घडली. या अपघात दोन जण जखमी असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, याप्रकरणी कारचालकाविरूध्द एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल केला असून पोलीसांनी कार जप्त करण्यात आली आहे. जामनेर तालुक्यातील सिंगोडा गावाला यात्रा भरली आहे. त्यामुळे मेहरूण परिसरातील भवानी नगर येथील नरेंद्र पुरूषोत्तम सानप (19) व आकाश भगवान मिस्तरी (18) हे दोघे तरूण दुचाकी क्रं. एमएच.19.सीएन.1121 ने यात्रा पाहण्यासाठी सोमवारी निघाले. दुचाकी नरेंद्र सानप हा चालवित होता. दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास चिंचोली गावाजवळून यात्रेसाठी जात असतांना औरंगाबादकडून भरधाव वेगात येणार्‍या पांढर्‍या रंगाची ब्रिजा कार (क्रं.एमएच.19.3155) ने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. यात दोघे तरूण फेकले गेले व नरेंद्र याला डोक्याला, हाता-पायाला गंभीर दुखापत झाली. तर आकाश याला हाता-पायाला किरकोळ मार बसला. या दरम्यान, मागुन येत असलेले मेहरूण परिसरातील प्रशांत नाईक, रविंद्र ढाकणे, भिमराव ढाकणे, निलेश सानप यांना नरेंद्र, आकाश हे जमखी अवस्थेत दिसून आल्यानंतर त्यांनी दोघांना जखमी अवस्थे उचलून जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. नरेंद्र यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असल्याने त्याला लागलीच खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले. यावेळी नरेंद्र यांच्या नातेईकांनी व मित्रमंडळींनी रूग्णालयात गर्दी केली होती. यानंतर आकाश भगवान मिस्तरी यांनी दुपारी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून कारचालकाविरूध्द तक्रार दिली. त्यावरून कारचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले. दरम्यान, पोलीसांनी कार ताब्यात घेतली आहे.