यवतमाळच्या तरूणाला कुटूंबियांच्या केले स्वाधीन

0

जळगाव- फळगल्लीतील विजेच्या खांबावर चढून गांधळ घालणार्‍या आश्विन निवृत्ती इंगोले या तरूणाला शुक्रवारी सकाळी शहर पोलीसांनी समज देवून कुटूंबियांच्या स्वाधीन केले. यावेळी त्याला घेण्यासाठी अश्विन याचा भाऊ व गावाचे पोलीस पाटील यांनी सकाळी 9 वाजताच शहर पोलीस स्टेशन गाठले होते.

दादर येथील चैत्यभूमीहून निघालेला यवतमाळ जिल्ह्यातील आश्विन निवृत्ती इंगोले (वय 35) याने गुरुवारी अचानक जळगाव रेल्वेस्थानकावर उतरला आणि फळ गल्लीतील विजेच्या खांबावर चढला होता. यामुळे पोलिस, महापालिका आणि महावितरणच्या यंत्रणेची तारांबळ उडाल्याचे दिसले. तब्बल एक तासानंतर तरुणाला दिसणार नाही अशी मागच्या बाजूने क्रेन वर नेऊन तरुणाला बखोटी धरून खाली उतरवले व त्याला शहर पोलीसांच्या ताब्यात दिले. त्याची विचारपुस केली असता त्याने मारत असल्याचे सांगत इतर प्रश्‍नांचे उत्तर देत नव्हता. त्याच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीवरून नातेवाईकांशी पोलीसांनी संपर्क साधून तरूणाविषयी माहिती दिली. शुक्रवारी सकाळीच 9 वाजता अश्विन याला गावाला परत घेवून जाण्यासाठी त्याचा भाऊ पंकज इंगोले व वाई मेंढी गावाचे पोलीस पाटील रामेश्‍वर लक्ष्मण सोनटक्के यांनी शहर पोलीस स्टेशन गाठले. यानंतर शहर पोलीसांशी त्यांनी भेट घेवून घडलेल्या प्रकाराविषयी माहिती घेतली. पंकज इंगोले यांनी भाऊ लक्ष्मण याला काय प्रकार घडल्याचे विचारल्यानंतरही त्याने मला मारत असल्याचे सांगितले व यानंतर त्याने काहीच सांगितले नाही. अखेर अश्विन याला शहर पोलीसांनी समज देवून भाऊ पंकज इंगोले यांच्या स्वाधीन केले.