म्हैसवाडीच्या बेपर्वा पोलिस पाटलाविरुद्ध गुन्हा व निलंबनही

0

यावल : गावात झालेल्या लग्नाची माहिती लपवणे तालुक्यातील म्हैसवाडीच्या महिला पोलिस पाटलाच्या चांगलेच अंगलट आले असून त्यांचे प्रांताधिकारी अजित थोरबोले यांनी निलंबन करीत गुन्हा दाखल केल्याने यावल तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे विशेष म्हणजे गावातील या विवाहामुळे म्हैसवाडीतील 21 ग्रामस्थांना बाधा तर झाली शिवाय एकाचा मृत्यूही झाला तर 50 पेक्षा अधिक वर्‍हाडींनी या विवाहाला हजेरी लावल्यानंतर प्रशासनाला पोलिस पाटलांनी माहिती न दिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. प्रफुल्ला गोटुलाल चौधरी असे निलंबीत पोलिस पाटलांचे नाव आहे.

प्रांताधिकार्‍यांच्या आदेशाने खळबळ
म्हैसवाडी, ता.यावल येथील मच्छींद्र जयसिंग चौधरी यांचा मुलगा विक्की व त्यांचे भाऊ गोरख जयसिंग चौधरी यांचा मुलगा जितेंद्र यांच्या विवाहाला 70 ते 80 लोकांचा जनसमुदाय जमला शिवाय सोशल डिस्टन्सला या विवाहात पालन न झाल्याने गावात कोरोनाचा फैलाव होवून 21 जणांना बाधा झाली. असे असतानाही म्हैसवाडी पोलिस पाटील यांनी विवाहाबाबतची तसेच गर्दी जमल्याची माहिती पोलिस यंत्रणा व महसूल यंत्रणेला दिली नाही. गावातून पोलिस यंत्रणेला माहिती पडल्यानंतर म्हैसवाडी पोलीस पाटील प्रफुल्ला चौधरी यांच्यासह दोन्ही विवाह संदर्भात 02 जुलै फैजपुर पोलीस स्टेशन स्टेशन येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, जळगाव जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग करणे तसेच पोलीस पाटील या पदावर कार्यरत असताना गावातील माहिती पोलीस स्टेशनला वेळेवर न दिल्याने फैजपूर प्रांताधिकारी अजित थोरबोले यांनी म्हैसवाडी पोलिस पाटील यांचे निलंबन केले असून बुधवारी याबाबतचे आदेश काढण्यात आले.

Copy