Private Advt

म्हसास गावातील 29 वर्षीय तरुणाची नैराश्यातून आत्महत्या

पाचोरा : पाचोरा तालुक्यातील म्हसास येथील एका 29 वर्षीय युवकाने व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवत नैराश्यातून आत्महत्या केली. पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करून ती पिंपळगाव हरेश्‍वर पोलिसात वर्ग करण्यात आली. कैलास आनंदा पाटील (29) असे मयत युवकाचे नाव आहे.

नैराश्यातून विहिरीत घेतली उडी
अविवाहित असलेल्या कैलास पाटील या युवकाने शुक्रवार, 29 एप्रिल रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास गावातील विहिरीत उडी घेतली. मयत कैलासने आत्महत्या करण्यापूर्वी काहीवेळ आधी आत्महत्येबाबत मोबाईलवरील व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवले होते. सदरील स्टेटस नातेवाईक व मित्रांनी बघताच सर्वत्र कैलास पाटील याचा शोध घेतला असता त्याचे काका यांना शेतातील विहिरीत कैलास पाटील याचा मृतदेह तरंगत्या अवस्थेत आढळून आला. ग्रामस्थांच्या मदतीने कैलास पाटील याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंखे यांनी शवविच्छेदन केले. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृत कैलासच्या पश्‍चात वृद्ध आई, वडील, दोन भाऊ असा परीवार आहे.