म्हसावद रेल्वे स्थानकाजवळ अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला

जळगाव- तालुक्यातील म्हसावद व माहेजी डाऊन रेल्वे ट्रॅकवर सोमवारी सकाळी 9.45 वाजेच्या सुमारास अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. या पुरुषाने आत्महत्या केली की तो रेल्वेच्या धडकेने मृत्यूमुखी पडला? यासंदर्भात तपास सुरू आहे.
पाँइंटमन विराज निकम यांना हा मृतदेह सकाळी माहेजी डाऊन रेल्वे ट्रॅक क्र.394/97 ते 315/1 दरम्यान आढळला. त्यांनी या घटनेबाबत स्टेशन मास्तर अशरफ मलिक यांना कळविले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.