मोहिद्यातील शेतकरी बिबट्याच्या हल्ल्यात ठार

1

तळोदा : तालुक्यातील मोहिदा येथील शेतकरी बिबट्याच्या हल्ल्यात जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे मोहिदा परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने तातडीने बिबट्याला पकडण्याची मागणी येथील नागरिक करीत आहे.

तळोदा तालुक्यातील मोहिदा येथील शेतकरी शरद खंडू चव्हाण वय ५५ हे आपल्या शेतात उसाची खेड करून घरी परत येत असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला.

वनविभागाने तातडीने बिबट्या ला पकडण्याची मागणी परिसरातील संतप्त शेतकरी व नागरिकांना केली असून बिबट्या नरभक्षक तर होणार नाही ना? अशी भीती परिसरात पसरली आहे.

Copy