मोहसिन शेखच्या हत्येत चूक धर्मव्यवस्थेची!

0

मुंबई । सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो टाकल्याने रस्त्यावर उतरलेल्या हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी जून 2014मध्ये पुण्यात मोहसिन शेख या युवकाची निर्घृण हत्या केली होती. या खूनप्रकरणात सेनेचा प्रमुख धनंजय देसाई यांच्यासह 21 आरोपी सहभागी आहेत. यांपैकी तीन आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्या तिघांना जामीन देताना मृत्यू झालेल्या तरुणाचा धर्म वेगळा असणे; एवढाच त्याचा दोष होता, असे मत न्यायालयाने नोंदवले होते.

मोहसिनचा दोष ऐवढाच होता की तो दुसर्‍या धर्माच्या होता. ही बाब आरोपींच्याही बाजूने जाते. कारण आरोपींचे गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. धर्माच्या नावाखालीच ही घटना घडली.

तिघांना जामीन देतांना काय म्हणाले न्यायालय
पुण्यात राहणार्‍या मोहसिन शेख या तरुणाची जून, 2014 मध्ये हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी निर्घृण हत्या केली होती. छत्रपती शिवाजीमहाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्यात आल्याने सेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. 2 जून, 2014च्या रात्री मोहसिन शेख आणि रियाझ हे नमाज अदा करून घरी येत असताना हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर रस्त्यातच हल्ला केला. धर्माच्या नावाखालीच ही घटना घडली आहे. त्यांना भडकवण्यात आले होते. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मोहसिन आणि रियाझ यांनी जीव वाचविण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र मोहसिन या प्रयत्नात कमी पडला तर स्वतःचा जीव वाचविण्यात रियाझ यशस्वी ठरला होता. दरम्यान, हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोहसिनची त्याच ठिकाणी हत्या केली. मोहसिन शेखच्या हत्येप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याच्यासह 21 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान तिघांना जामीन मंजूर करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश मृदूला भाटकर यांनी मत मांडले.