मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम

0

हैदराबाद : या सामन्यात विराट कोहलीने अजून एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. कोहलीने मायदेशात एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. विराट कोहलीने 15 डावांत 1116 धावा केल्या आहेत. यासोबतच विराट कोहलीने विरेंद्र सेहवागचा 12 वर्षांपुर्वीचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. विरेंद्र सेहवागने 2004-05 मध्ये 17 डावांत 69.06 च्या सरासरीने 1105 धावा केल्या होत्या. कोहलीने तब्बल 93 च्या सरासरीने या धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने चार शतक आणि दोन अर्धशतक ठोकले आहेत. विशेष बाब म्हणजे यावेळी विराट कोहलीने एकदाही शुन्यावर बाद झाला नाही. विरेंद्र सेहवागने 2004-05 मध्ये चार शतक लगावले होते. यामध्ये सेहवागची तीन अर्धशतकं होती. सेहवाग एकदा शुन्यावर बाद झाला होता.