मोबाईल चोरट्यांकडे रेल्वे पोलिसांचे दुर्लक्ष

0

जळगाव । रेल्वेत चोर्‍यांचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहे. मोबाईल चोरीच्या घटना वारंवार घडत आहे. मात्र रेल्वे पोलिस या प्रकराकडे सर्रास दुर्लक्ष करीत आहे. या घटनांमुळे प्रवाशांना कायमचे अपंगत्व किंवा जीव देखील गमवावा लागत आहे.

रेल्वे पोलिसांनी वेळीच कठोर पावले उचलुन भुरट्या चोरांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा अन्यथा आरपीआय (आठवले गट) महिला आघाडीच्यावीतने या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्यात येईल. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्यास रेल्वे पोलिस प्रशासन जबाबदार राहील. असा इशारा रिपाइं तालुकाध्यक्षा रमाताई ढिवरे यांनी प्रसिध्दीपत्राकाद्वारे दिला आहे.