मोबाईल चोरटयांनी केली होती सोनाराच्या दुकानात टेहळणी

0

जळगाव । शहरातील जीएस मैदानासमोरील जे.टी.चेंबरमधील वायरलेस वर्ल्ड या मोबाईलच्या दुकानावर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास डल्ला मारून तब्बल 16 लाख रूपये किंमतीचे 150 मोबाईल लांबविल्याची घटना 7 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली होती.

पोलीसांनी या घटनेचा तपास सुरू केला असुन चोरटे एक दिवस अगोदर स्टेशन रोड वरील एका सोनाराच्या दुकानात चौकशीसाठी गेले असल्याचे पोलीस सुत्रांतून सांगण्यात आले आहे. जे.टी.चेंबरमधील वायरलेस वर्ल्ड हे मोबाईल दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून 150 मोबाईल व काही रोकड लंपास केली. या घटनेतील चोरटा हा दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. त्यानंतर गुन्हे शोध पथकाच्या कर्मचार्‍यांनी शहरात या घटेसंदर्भात चौकशी केली असता त्यांना एका सोनाराच्या दुकानात चोरटे गेले असुन तेथे काहीतरी कारणाने चौकशी केली असल्याचे सांगण्यात आले.