Private Advt

मोबाईलवर अश्लील फोटो टाकून तरुणीची बदनामी : अज्ञाताविरोधात गुन्हा

जळगाव : शहरातील एका भागातील 28 वर्षीय तरुणीचे अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरून अश्लिल फोटो टाकून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
जळगाव शहरातील एका भागात राहणारी 28 वर्षीय तरुणी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. 26 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान अज्ञात अनोळखी नंबरवरील व्यक्तीने स्वतःची ओळख लपवून तरुणीची बदनामी होईल या उद्देशाने तरुणीला आणि तिच्या वडिलांना अश्लिल व धमकीचे मेसेज टाकले. त्याचप्रमाणे तरुणीचे फोटो डिजिटलच्या माध्यमातून अश्लिल फोटो तयार करून सोशल मीडीयावर टाकून बदनामी केली. ह प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणीने जळगाव सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात मोबाईलधारक विरोधात तक्रार दिल्याने अज्ञात मोबाईलधारका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.