मोफत नारळ न दिल्याने एकावर हल्ला : पाच जणांविरुद्ध गुन्हा

0

भुसावळ : मोफत नारळ न दिल्याने वाद उफाळून एकावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी दुपारी 4.30 वाजता ही घटना घडली. नारळ विक्रेते तुषार जंजाळे (श्रीराम नगर) यांच्याकडे मोफत नारळ मागितल्याने ते न दिल्याचा राग येवून संशयीत आरोपी रवींद्र ढगे, संजय ढगे, भावेश ढगे, पिंटू काळे आणि सुश्रृत झोपे (सर्व रा.श्रीरामनगर, भुसावळ) यांनी लोखंडी पाईपाने तुषार जंजाळे यांच्या डोक्यावर मारहाण केल्याने ते जखमी झाले. तपास हवालदार वाल्मीक सोनवणे करीत आहे. जखमी जंजाळे यांच्यावर डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

Copy