मोदी सरकार विरोधात गांधी जयंतीपासून अण्णा हजारे करणार आंदोलन

0

आंदोलन करू नये यासाठी राज्य सरकारची अण्णांसोबत चर्चा सुरू

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. लोकपाल आणि कृषी समस्या या विषयांवर दोन ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीपासून अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. भाजपाच्या अनेक नेत्यांनी यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला मात्र अण्णा हजारे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे मोदी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. लोकपाल बाबत सरकारकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याबाबत आपण ठाम असल्याचा निर्धार अण्णा हजारेंनी केला आहे.

अण्णा हजारे येत्या 2 ऑक्टोबरपासून राळेगणमध्ये आंदोलन करणार असले, तरी दिल्ली व देशातील अन्य अनेक ठिकाणी आंदोलनाची तयारी सुरु आहे. देशात सध्या भाजपच्या विरोधात वातावरण तयार होतं असून अशावेळी अण्णांचं आंदोलन भाजपला परवडणारं नाही. दरम्यान, अण्णांनी उपोषण करू नये यासाठी राज्य सरकारनं अण्णांसोबत चर्चा सुरू केलीय. याकरता अण्णा हजारे यांच्यासोबत प्राथमिक चर्चेची जबाबदारी सरकारनं गिरीश महाजन यांच्यावर सोपवली आहे.