मोदी महापुरुष, त्यांच्यामुळेच आजचा दिवस

0

अयोध्या: अयोध्येतील ऐतिहासिक राम मंदिर भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला आहे. दुपारी १२ वाजून ४४ मिनिटांचा हा मुहूर्त होता. या मुहूर्तावर हा सोहळा संपन्न झाला. १९९२ नंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी राम जन्मभूमीवर दाखल झाले आहे. राम मंदिर झाल्याशिवाय अयोध्येत येणार नाही हा संकल्प त्यांनी आज पूर्ण केला असून तब्बल २८ वर्षानंतर ते राम जन्मभूमीत आले आहेत. भूमिपूजन सोहळ्यात मोदी काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

राम मंदिराच्या रूपाने पाचशे वर्षाची प्रतीक्षा संपली आणि संपूर्ण हिंदू बांधवांची इच्छा साकार झाली आहे. हा क्षण ज्या नरेंद्र मोदी या महापुरुषामुळे आला असे गौरोद्गार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काढले. राम मंदिर होणार नाही असेच समज झाले होते. मात्र ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झाले आहे. मोदींमुळे भारतवासीयांची ही ऐतिहासिक इच्छा पूर्ण झाली आहे.

Copy