VIDEO: मोदी फक्त स्वत:ची प्रतिमा वाचविण्याच्या चिंतेत: राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

0

नवी दिल्ली: भारत-चीन सीमावादावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केले आहे. राहुल गांधी यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रश्नांचा भडीमार केला आहे. राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ ट्वीटरवर पोस्ट केला आहे. यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका करत असल्याचे दिसून येते.

भारत-चीन सीमावाद हा साधारण वाद नाही. चीन मोठ्या रणनीती शिवाय असे वाद उभे करत नाही. ते भारताविरुद्ध कोणत्याही स्थराला जाऊ शकतात. त्यांनी भारताच्या सीमाहद्दीवर बसले आहेत. मोदींनी स्वत: ची सत्तेत येण्यासाठी ५६ इंचची बलवान असल्याची खोटी प्रतिमा तयार केली. मात्र आता चीनने भारतीय भूभागावर अतिक्रमण केल्याने मोदींना त्यांच्या स्वत:च्या ५६ इंचच्या प्रतिमेची चिंता होऊ लागली आहे अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. निवडणुकीच्या काळात त्यांनी दाखविलेला बलवान पणाची बाजू चीनच्या भूमिकेमुळे कमकुवत दिसू लागली असून स्वत:च्या प्रतिमेवरून मोदी चिंतीत आहे.

मोदी चीनचा सामना करणार आहेत का?, चीनचे आव्हान स्वीकारणार आहेत का?, असे प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केले आहे.

Copy