मोदीजी योग सुरु करा, तेच अर्थव्यवस्थेला पुन्हा सुरु करू शकते; राहुल गांधींचा खोचक टोला !

0

नवी दिल्लीः काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आर्थिक मोर्च्यावर केंद्र सरकारला घेरले आहे. राहुल गांधींनी आपल्या ट्विटवर नरेंद्र मोदी योगा करत असलेला व्हिडीओ पोस्ट केला आहे. बजेटवर टीका करत राहुल गांधींनी मोदींनी पुन्हा एकदा योगा करण्याचा सल्ला दिला आहे.

कृपया आपला जादुई व्यायामाचा दिनक्रम पुन्हा करा! तेच अर्थव्यवस्थेला पुन्हा सुरू करू शकते. तत्पूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी 2020-21च्या बजेटवर टीका करत त्यात काहीही नसल्याचं सांगितलं. बेरोजगारीशी दोन हात करण्यासाठी मोदी सरकारनं काहीही प्रयत्न केलेले नाहीत. बजेटमधून रोजगार निर्माण होतील अशी कोणतीही उपाययोजना केल्याचं मला दिसलेलं नाही.

इतिहासातील सर्वात मोठं आणि लांब भाषणाचा हा बजेट असू शकतो, परंतु यात काहीही ठोस असं नाही. यात जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा नव्यानं सांगण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा अर्थमंत्र्यांचा दावा पोकळ आहे. त्यात काहीही तथ्य नाही. कृषी विकासदर दोन टक्क्यांवर आला आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होण्यासाठी कृषी विकासदर 11 टक्क्यांवर असला पाहिजे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी केली आहे.