मोदींनी रोजगाराचे साधनच नष्ट केले; राहुल गांधींचा घणाघाती

0

नवी दिल्ली: कोरोनामुळे देशातील आर्थिकस्थिती खालावली आहे. उद्योग-धंदे बंद पडल्याने मोठ्या प्रमाणात रोजगार गेले आहे. मात्र कोरोना नाही तर या सरकारच्या नीती आणि धोरणामुळे देशातील तरुणांच्या हातातील रोजगार गेला आहे. देशात ७० वर्षात कधीही रोजगार जाण्याची नामुष्की देशावर आली नाही ती मोदी सरकारच्या धोरणामुळे आली आहे. देश तरुणांना रोजगार देऊ शकणार नाही, कारण मोदी सरकारने रोजगार देण्याचे साधनच नष्ट केले आहे असा घणाघाती आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांचा एक व्हिडिओ एएनआयने पोस्ट केला आहे.  यात ते मोदी सरकारवर टीका करत आहेत.

मोदी सरकारच्या धोरणामुळे लघू, मध्यम उद्योग डबघाईला गेले. त्यामुळे साहजिकच रोजगार गेला. या गोष्टी मी सातत्याने सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या मात्र सरकार आणि माध्यमांनी माझी चेष्टा केली. परंतु वेळ निघून गेल्यावर याचा पश्चताप होईल असेही राहुल गांधी यांनी सागितले आहे.