मोदींनी देशाचा सत्यानाश केला, लवकरच भ्रम तुटणार; राहुल गांधींचे आरोप

0

नवी दिल्ली: कॉंग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष करतांना दिसत आहेत. भारत-चीन संबंधावरून देखील राहुल गांधींनी मोदींना लक्ष केले होते. चीनने भारतीय भूभागावर ताबा मिळविला आहे. मात्र मोदी स्वत:ची प्रतिमा खराब होऊ नये यासाठी देशाशी खोटे बोलत असून सत्य सांगत नसल्याचे आरोप राहुल गांधींनी यापूर्वी केले आहे. दरम्यान राहुल गांधींनी अर्थव्यवस्थेवरून लक्ष केले आहे. मोदींनी देशाचा सत्यानाश केला या शब्दात राहुल गांधींनी मोदींवर टीका केली आहे.

करोनामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असून, त्याचा रोजगार वाढीलाही फटका बसला आहे. सरकारने संसदीय समितीला माहिती देताना १० कोटी नोकऱ्या धोक्यात आल्याची माहिती दिली असल्याच्या वृत्ताचा हवाला देत राहुल गांधींनी ट्वीट केले आहे. यात “मोदी देशाला बर्बाद करत आहेत,” असा आरोप केला आहे.

वाणिज्य मंत्रालयाशी संबंधित संसदेच्या स्थायी बैठकीत केंद्रीय अधिकाऱ्यांना धोक्यात आलेल्या नोकऱ्यांबद्दल माहिती दिली. करोनाचा परिणाम झाल्यामुळे देशात १० कोटी नोकऱ्या संकटात असल्याचं केंद्र सरकारनं समितीला सांगितलं. हे वृत्त ट्विट करून राहुल गांधी यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.

“मोदी देशाला बर्बाद करत आहेत. पहिली नोटाबंदी. दुसरी जीएसटी. तिसरी करोना महामारीत झालेली वाईट परिस्थिती आणि चौथ म्हणजे अर्थव्यवस्था व रोजगाराचा झालेला सत्यानाश. त्यांच्या भांडवलशाही माध्यमांनी मायाजाळ तयार केले आहे. हे भ्रम लवकर तुटणार आहेत,” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

काल भारतात राफेल विमाने दाखल झाली आहेत. राफेलमुळे भारतीय नौदलाच्या क्षमतेत मोठी वाढ झाली आहे. राफेलचे भारतात स्वागत करण्यात आले आहे. राहुल गांधींनी याचे स्वागत केले आहे. मात्र सरकारला प्रश्न देखील केले आहे.