मोदींना हाटवून गडकरी होणार पंतप्रधान ?

मुंबई – देशात कोरोनाचा कहर कमी व्हायला तयार नाहीये , त्यात करोनामुळे देशभरात लाखो नागरिकांचा मृत्यू होत आहे. अश्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याचं सोयरसुतक नाही. यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जागी नितीन गडकरी असायला हवे होते असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत. भाजपामध्ये मोदींना हटवून गडकरी यांना पंतप्रधान करायचं अशी चर्चा सुरू असल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान होतोय याचा आम्हाला आनंद आहे ते म्हणाले आहेत. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.