मोतीमाता यात्रोत्सवानिमित्त तयारी पुर्ण

0

भुसावळ : निसर्गरम्य ठिकाणी वसलेल्या मांडवेदिगर येथे नवसाला पावणारी माता म्हणून ख्याती असलेल्या मोतीमातेची यात्रा गुरूवार 12 जानेवारी रोजी आहे. मंदिरात मातेची सिंहासनावर आरुढ असलेली विलोभनिय मुर्ती आहे. मातेच्या दर्शनासाठी अनेक राज्य व प्रांतातून साधू संत, महात्म्ये येतात. भाविक आपला नवस मातेजवळ बोलून तो पूर्ण झाल्यावर नवस फेडण्यासाठी नऊ दिवसांचा उपवास करतात.

पौर्णिमेला मानला जातो नवस
पौर्णिमेला यात्रेच्या दिवशी आपल्या मनातील इच्छा मातेस पूर्ण करण्यासाठी मातेस साकडे घालतात. ज्यांच्या भक्ती शक्तीच्या जोरावर यात्रा भरविणारी मोती मातेची खास भक्तन पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेली भक्तन हबीबाई यांचीही ख्याती आहे. सालाबाद प्रमाणे यंदाही मोतीमातेच्या यात्रेस व दर्शनास सुरत, गुजरात, मराठवाडा, विर्दी, मुंबईसह खान्देशातील हजारो भाविक येतात.

मंदिर समितीसह ग्रामस्थांकडून व्यवस्था
यात्रेस अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच गावातील मोती माता संरक्षण समिती, रामदेवजी तरुण मंडळ, जय माँ काली तरुण मंडळ, लक्ष्मणजी बापू साधक परीवार, इच्छापूर्ती हनुमान ट्रस्ट व गृप ग्रामपंचायतमार्फत देखील बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यात्रेत येणार्‍या भावकांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त भुसावळ येथून मांडवेदिगरला सकाळी 7 वाजता, 9.30 वाजता व मांडवेदिगर ते भुसावळ सायंकाळी 5 वाजता बस असून जामनेरहून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.